ताज्या घडामोडी
स्नेहा लांडगे हिने नीट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल केला सन्मान

कळंब (प्रतिनिधी):-
कळंब तालुक्यातील खोंदला येथील कु.स्नेहा अविनाश लांडगे हिने वैद्यकीय क्षेत्रातील म्हत्वाच्या मानल्या जाणा-या नीट २०२४ मध्ये ६३५ गुण मिळवल्याबद्दल श्री.संत रामचंद्र बोधले महाराज पतसंस्थेचे चेअरमन प्रा.महादेव काळें व संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर वि.कळंब चे विशेष शिक्षक आश्रुबा कोठावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेहाने खूप मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले आहे.तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे. तसेच तिने अकरावी व बारावीचे शिक्षण राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय लातूर येथे झाले आहे.आई वडिलांनी शेतात कष्ट करून तिला शिक्षण शिकवले असल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहाच्या यशाबदल सर्वत्र तिथे कौतुक होत आहे.यावेळी अविनाश लांडगे,ओम लांडगे, आई,आजी व आजोबा उपस्थित होते.