ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे ग्रामपंचायत सदस्याने केली मुतारीची फवारणी

जयनारायण दरक/कळंब

कळंब (प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी दि.१५ डिंसेबर रोजी प्रभाग क्रमांक १ मध्ये पाठीवर फवारा घेऊन स्वताच्या खर्चाने स्वत: डास प्रतिबंधात्मक औषधी मुतारीची फवारणी करण्यात आली. गावामध्ये डेंग्यू ची परिस्थिती जोरात सुरु असुन याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असुन कुठल्याही प्रकारची कर्मचारी दखल घेत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू चे रुग्ण गावांमध्ये आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन कळवण्यात आले होते.परंतु या निवेदनाची आरोग्य विभागाने दखल घेतली गेली नसल्याने व दररोज डेंग्यू चे रुग्ण वाढत असल्याने. तसेच मुतार्याही जागोजागी तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढलेली आहे.तसेच आरोग्य विभाकडुन कसल्याही प्रकारच्या उपाय योजना राबविल्या नसल्याने नकारात्मक दृष्टिकोन दिसुन आला. त्यामुळे स्व: खर्चाने वार्ड फवारणी करुन घेतली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी सांगितले आहे. तर गावातील मुतार्या उपसुन धुरळणी करुण घ्यावी अशी मागणी ही ग्रामस्थांकडुन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.