दत्त जयंती निमित्त रुईभर येथे नामस्मरण सप्ताहाचे आयोजन

तेरणा काठ वृत्तसेवा
साक्षात दत्तगुरू असणारे रुईभर येथील आप्पा बाबा महाराज यांच्या मठात दत्त जयंती निमित्त नामस्मरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत मोठ्या आनंदाने रुईभर येथे श्री दत्त जयंती उत्साह साजरा होणार आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून रुईभर येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. येथे विशेषत: दरवर्षी नाम सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भावीकभक्त येत असतात.यामुळे येथील भक्तीमय व आनंददायी वातावरणामध्ये आणखीन भर पडते. नामस्मरण सप्ताहमध्ये मध्ये गायन, भजन, गुरुचरित्र पारायण, वाद्य संगीत अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात.
तरी भाविक भक्तांनी या सर्वांचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्त मंदिर संस्थानचे परमपूज्य श्री आप्पा बाबा महाराज रुईभरकर यांनी केली आहे