येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्युएएस) प्रमाणापत्र प्राप्त

तेरणा काठ न्युज
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्युएएस ) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.या मुल्यांकनात येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र झाले आहे
येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कमिटीच्या दोन मूल्यांकन अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली होती त्यामध्ये दवाखान्यातील चांगल्या कामगिरीच्या सुविधा ओळखणे , समुदायातील सार्वजनिक रुग्णालयांची विश्वासार्हता सुधारणे.बाह्य रूग्ण विभाग,अंतर रुग्न विभाग ,प्रसुती विभाग.प्रयोगशाळा,राष्टीय आरोग्य कार्यक्रम,सामान्य प्रशासन ,परीसर स्वच्छता अशा विविध सेवा रुग्णांच्या आवश्यकते नुसार कशा पुरविल्या जातात यातील बारकावे, सुविधा,सेवा,तपासून आरोग्य केंद्राना मानके दिली जातात यामध्ये येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र झाले आहे. पात्र झाल्याचे मानक प्रमाणपत्र मिळणार असून यामुळे रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीष हरीदास जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ बिरादार सुधाकर व डॉ .सचिन तेलप यांच्यासह दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना हे यश मिळाले आहे.