कळंब पोलीस ठाणे वाहतूक शाखा अलर्ट मोडवर

कळंब पोलीस ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने 190 वाहनांवर कारवाई यामध्ये 86 हजार 150 रुपयाचा केला दंड कळंब .कळंब ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने 190 वाहन व मोटरसायकल यांच्यावर केसेस करून दंड लावला यामध्ये मोटर सायकल लायसन नसणे ट्रिपल सीटओव्हरलोड तसेच अठरा वर्ष खालील मुलांना गाडी देणे अशा अशा प्रकारच्या विविध केसेस एका महिन्यामध्ये दाखल केल्या त्यामध्ये एकूण 86150 दंड ठोठावला माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय अधिकारी संजय पवार कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राम बहुरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे , रवी कोरे यांनी कार्यवाही केली आहे. चौकट. सर्व पालकांना कळंब पोलीस ठाणे वतीने आव्हान आपल्या 18 वर्षी खालील पाल्यांना मोटरसायकल चालवण्यास देऊ नये अन्यथा शहरातील सर्व चौकामध्ये दररोज वाहन तपासणी करण्यात येणार आहे व यामध्ये जर अल्पवयीन पालक आढळला तर दंड वसूल करण्यात येईल असे अहवाल कळम पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी केले