जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात कळंब आयटीआयची जिल्हास्तरावर निवड, पुढे विभागीय स्पर्धेत घेणार सहभाग

जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनातुन कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायातील अक्सिडेंट कंट्रोल सिस्टीम ऑन हिल एरिया या तंत्राची विभागीय स्तरावर सहभाग घेण्यासाठी निवड झाली आहे.
धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि 21 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी विविध प्रकारचे प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायाच्या बारकुल पृथ्वीराज बालाजी आणि खंडागळे ओमकार रमेश प्रशिक्षणार्थीनी
प्राचार्य केशव पवार, गट निदेशक शामकांत डोंगे यांच्या प्रेरणेने
शिल्प निदेशक शरद बेलेकर व कल्लेश भोसले यांच्या मार्गद्शनाखाली केलेल्या ॲक्सिडेट कंट्रोल सिस्टीम इन हिल एरिया या प्रोजेक्टची विभागीय स्तरावर सहभाग घेण्यासाठी निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्षणात एकूण 43 प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते त्यापैकी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथील यांत्रिक मोटारगाडी व्यवसायाच्या प्रोजेक्टची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे आणि कौशल्य विकास व उद्योजकता अधिकारी संजय गुरव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.