येरमाळा येथील दिव्यांग प्रहार संघटनेचे आंदोलन

तेरणा काठ वृत्तसेवा
दिनांक 8 जुन रोजी पासून माजी सामाजिक न्यान्य मंत्री, प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष बच्चु भाऊ कडू अमरावती जिल्ह्यातील मोजशी येथे बसले असून दिव्यांगाच्या पगारवाढ ,शेतकरी कर्जमाफी अशा विविध मागण्या मान्य करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनास बसले असून त्यांना प्रहार दिव्यांग संघटना येरमाळा येथील कार्यकर्ते मारुती वाघमारे यांनी मुंडन करून बच्चु कडू यांना पाठिंबा दर्शविला आहे.
येरमाळा दिंव्यांग संघटनेच्या वतीने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले व बच्चु कडू यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले . निवेदनावर प्रहार संघटनेचे शाखाअध्यक्ष मारुती वाघमारे, उपाध्यक्ष किरण बारकुल, सदस्य गोपाळ कोकाटे, दत्ता मनगिरे. शेरखान पठाण,रजिश बारस्कर, गणेश गोरे,दशरथ बांगर, दिगंबर गाढवे. वसंत जाधवर, विष्णु शिंदे. गणेश गोरे. सचिन बारकुल विश्वास लोमटे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.