ताज्या घडामोडी

श्रीपतराव भोसले हायस्कूलने 10 वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले

धाराशिव : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही एस.एस . सी . बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले असून तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 100 % गुण अर्जित केले असून प्रशालेचा एकूण निकाल 98 .97 % इतका लागला आहे.
प्रशालेतून प्रथम हर्षद संतोष तोडकरी , द्वितीय प्राची युवराज सुर्यवंशी , तृतीय महादेव शिवाजी शेलार असून यांना 100 % गुण प्राप्त झाले आहेत .
महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या मराठी प्रशालेत या वर्षी 10 वीला 877 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते .
यापैकी 90 ते 99 % घेतलेले 183 विद्यार्थी तर 70 ते 89 .99 % घेतलेले 42 1
तर 35 ते 69. 99% घेतलेले 249 विदयार्थी असे 877 पैकी तब्बल 868 विद्यार्थी पास झाले आहे . फक्त 9 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असले तरी ते 11 वीला प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला या वेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की , धाराशिव मध्येही आता वैद्यकिय व अभियंत्रिकी शिक्षणासाठी असलेल्या पूर्वतयारीची श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजमध्ये उत्तम तयारी करून घेण्यासाठी फोटॉन बॅच उपलब्ध केली असून त्यासाठी कोटा , दिल्ली या सारख्या ठिकाणाहून आणलेल्या तज्ञ अध्यापक वर्ग १० वर्षापासून कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्ही पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे , असे सांगितले त्यामुळे आपल्या पाल्यांना इतरत्र पाठवण्यापेक्षा येथे ठेवावे , असेही त्यांनी आवर्जून नमूद केले .
यावेळी संस्था सचिव प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , संस्था सदस्य संतोष कुलकर्णी , संस्था सदस्य तथा फाऊडेशन बॅच चे प्रमुख यु.व्ही . राजे ,प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख , प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तर १० वीचे पर्यवेक्षक यशवंत इंगळे व सर्व पर्यवेक्षक , गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख मनोज भुसे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले तर शेवटी आभार प्राचार्यांनी मानले .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.