ताज्या घडामोडी

वेद शैक्षणिक संकुलात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

कळंब – विद्वतेचा प्रकांड पांडित्य भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार प्रज्ञासूर्य बॅरिस्टर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त दि.६ डिसेंबर २०२३ रोजी कळंब शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सांस्कृतिक सभागृहात प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी प्रा.श्रीकांत पवार यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशहितासाठी,स्त्रियांसाठी,मानव मुक्तींसाठी केलेली कार्य विषद केली.याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशिका कल्याणी भराटे,निदेशक विनोद जाधव,निदेशक सागर पालके, लिपिक आदित्य गायकवाड, विनोद कसबे,सर्व प्रशिक्षणार्थी व छात्राध्यापकांची उपस्थिती होती.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.