महाराष्ट्र सहकार भारती लातूर विभागाच्या सहप्रमुखपदी संतोष तौर यांची निवड

तेरणा काठ न्युज
जनहित परीवाराच्या माध्यमातून यशाला गवसणी घालणारे संतोष तौर यांची महाराष्ट्र सहकार भारती लातूर विभागाच्या सहप्रमुखपदी निवड करण्यात आली.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संतोष तौर यांनी जनहित पतसंस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून जनहित परीवार उभा केला, परिवारात येणाऱ्या व्यक्तींची अडचण ओळखून त्यांना तत्परतेने मदत करण्याच्या नेहमी तयारीत असलेल्या संतोष तौर यांनी अगदी कमी वेळात जनसामान्यांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. सहकार चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकार भारती या संघटनेत तालुका स्तरावर चांगले काम करत असल्याचे वरीष्ठांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तौर यांच्याकडे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष या पदासाठी निवड केली.याही पदाला तौर यांनी चांगला न्याय मिळवून दिला. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना एकत्रित करून सहकार भारती संघटनेचे बळ वाढविले.याची वरीष्ठांनी दखल घेऊन त्यांच्याकडे आता विभागीय स्तरावरची जबाबदारी दिली असून त्यांची लातूर विभागाच्या सहप्रमुखपदी शिर्डी येथे होत असलेल्या संघटनेच्या अधिवेशनात निवड केली आहे
यावेळी राष्ट्रीय महामंत्री डॉ उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजयजी पाचपोर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताराम चाळके,महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन सन्मान केला आहे संतोष तौर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.