ओमप्रकाश निंबाळकर यांच्या विजयासाठी भारत जोडो अभियान कटिबद्ध – साथी सुभाष लोमटे

कळंब/जयनारायण दरक
संविधान आणि लोकशाही मोडीत काढू पाहणाऱ्या आरएसएस भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या ओमप्रकाश निंबाळकर यांच्या विजयासाठी भारत जोडो अभियान कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारत जोडो अभियानाचे राज्य समन्वयक साथी सुभाष लोमटे,संभाजीनगर यांनी संविधान बचाव परिषदेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानी केले.
पर्याय संस्थेच्या हॉलमध्ये करीम हावरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ मे २०२४ रोजी दुपारी ५.०० वाजता संविधान बचाव – देश बचाव परिषद संपन्न झाली.
या परिषदेमध्ये डॉ.स्मिता शहापूरकर धाराशिव,साथी बळवंत मोरे नांदेड,साथी आप्पाराव मोरताटे परभणी,साथी मेजर सुखदेव बन संभाजीनगर,ज्योती सपाटे,सायसराव जाधवर आदींनी भारत जोडो अभियानाची धाराशिव लोकसभा निवडणुकीची रणनिती विषद करून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश निंबाळकर यांना प्रचंड मतानी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
या परिषदेची प्रस्तावना जिल्हा समन्वयक तथा स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष द.घोडके यांनी केली.सुत्रसंचालन प्रा. अविनाश घोडके यांनी केली तर आभार ज्ञानदा बहुद्देशीय संस्थेचे बंडू ताटे यांनी मानले.
सुभाष घोडके लिखित सत्य घटनेवर आधारित असलेली साक्षी कादंबरी व साक्षी पावनज्योतचा महाराष्ट्र दिन विशेषांक देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या परिषदेस सुरेखा जगदाळे,आम्रपाली काळे,
श्याम तोडकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.