ताज्या घडामोडी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर जोराची धडक देऊन पलटी झाल्याने गाडीतील १०वासरे मयत झाली

तेरणा काठ न्युज 

सोलापुर-संभाजीनगर महामार्गावरील तेरखेड्याजवळ जनावराची वासरे घेऊन जाणारा मालवाहतुक पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये १० मयत तर ३५ जखमी झाल्याची घटना दि.३१रोजी सांय.७ वाजेच्या सुमारास घडली आहे
याबाबत पोलिस सुञाकडून मिळालेली माहीती अशी की,सोलापुर-संभाजीनगर महामार्गावरील तेरखेडा येथिल हॉटेल आरुषजवळ बिडकडुन येरमाळ्याकडे जनावराची वासरे घेऊन जाणारा मालवाहतुक पिकअप (क्र.MH.42.M.6409) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर जोराची धडक देऊन पलटी झाल्याने गाडीतील १०वासरे मयत झाली तर ३५ वासरे जखमी झाली आहेत .या घटनेची माहीती मिळताच येरमाळा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंरतु चालक व इतर काही जण फरार झाले असुन सदरील घटनेची नोंद येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये घेण्यात आली असुन पुढिल तपास येरमाळा पोलिस करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.