ताज्या घडामोडी

अखिल भारतीय हिंदू-खाटिक समाजाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी राजकुमार विश्वनाथ निचळे यांची निवड

अखिल भारतीय हिंदू-खाटिक समाजाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी राजकुमार विश्वनाथ निचळे यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष
स्मेश रघुनाथराव जाधव यांनी दिले आहे

या नियुक्ती पत्रात , आपले सामाजिक कार्यातील योगदान, संघटन कौशल्य कार्यतत्परता, समाजकार्याची आवड व समाजाविषयी आस्था याची दखल घेऊन संघटन श्रेष्ठीच्या सहमतीने अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज (रजि. नं. ३१/३७५) संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष यापदी नियुक्ती करण्यात येत आहे
संघटन घटनेच्या अधीन राहून श्रेष्ठींच्या आदेशानुसार संघटनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवितांना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊन त्यांना सोबत घेऊन समाज मजबुतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो. संघटन व समाज आपल्याकडून अपेक्षा करतो की, आपण सत्य, निष्ठा व इमानदारीने अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज (रजि. नं. ३१/३७५) संविधानाचे पालन कराल व समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत समाजाप्रती आपले उत्तरदायित्वाचे पालन कराल. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक, वैज्ञानिक व आर्थिक विकासासाठी आपण सदैव कार्यशील राहाल नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.