ताज्या घडामोडी

आयुष्याकडं व विषयांकड सकारात्मक बघायला शिका –जिल्हाकारागृह अधिक्षक रामराजे चांदणे

येरमाळा (प्रतिनिधी) ऐकणं, वाचणं, आणि बघणं यामध्ये चित्ररूपी बघणं हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने जिवनाकडे सकारात्मक विचारांने आयुष्याकडे व विषयांकडे बघायला शिका असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधीक्षक यांनी
विद्यानिकेतन विद्यालयात दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात केले.
येरमाळा येथील माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोके सर होते यावेळी
जिल्हा कारागृह रत्नागिरी येथील अधीक्षक रामराजे चांदणे तसेच डीसीओ गायकवाड जिल्हा परिषद धाराशिव आणि अमोल उमाप सर जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थिती होती जिल्हा कारागृह अधीक्षक चांदणे यावेळी बोलताना म्हणाले की, *यशाला शॉर्टकट नसतो* हे उदाहरण त्यांनी फिजिक्स मधील थेरी सांगून विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच मानवी जीवाला ऐकणं वाचणं आणि बघणं यामध्ये चित्ररूपी बघणं हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.अभ्यास करताना विषय हा समजुन घ्या.याने लक्षात चांगले राहते.नंतर डीसीओ गायकवाड यांनी *शिवाजी महाराज* सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वताचे घडवा असे सांगितले तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण म्हणजेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यानिकेतन विद्यालय हे मुलांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहील यापुढे देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम करेल असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सानप सर,लोंढे सर ,गायकवाड अमोल सर ,डोके सर , जाधवर सर, पवार सर ,गायकवाड मॅडम, कोळगे , बारकुल मॅडम, बांगर सर,यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन अमोल गायकवाड सर यांनी केले

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.