उस्मानाबाद लोकसभेच्या मतदार संघातील पाचही आमदारांचा सुफडा साफ करणार – खा.ओमराजे निंबाळकर

तेरणा काठ वृत्तसेवा
– कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची तिमडी वाजवणाऱ्या उस्मानाबाद लोकसभेच्या मतदार संघातील पाचही आमदारांचा सुफडा साफ केला नाही तर नाव सांगणार नाही.असा इशारा उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेंनिबाळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार कैलास पाटील यांच्या येरमाळा येथील प्रचार सभेत इशारा दिला.
येरमाळा येथील प्रचार सभेत पुढे बोलताना उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या परंडा भूम,मतदार संघातील उमेदवार माजी पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत, उस्मानाबाद – कळंबचे उमेदवार अजित पिंगळे,उमरग्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुले,औसाचे माजी आमदार अभिमन्यु पवार,तुळजापूरचे माजी आमदार राणा जगजितसिंह पाटील, आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना कोट्यावधी रुपयांचा विकास केल्याचा प्रचार करत आहेत,जे सावंत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलामुळे आमदार झाले,विरोधी उमेदवार काल पर्यंत कमळाचा होता तो चोरलेला धनुष्यबाण घेऊन आलाय आणि मी हाफ चड्डी पासूनचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याच्या गप्पा मारतोय,तर उमरग्याचं गैबानं कपबश्या इसळीत व्हतं त्याला आमदार केलं,आनं ते बार्शीच उगाच जरांगे दादाला नडलं त्याचा कार्यक्रमचं हाय बगा यंदा,ज्या मराठा माय माऊलीवर देवेंद्र फडणवीसने लाठीचार्ज केला तवा काळा दिवस नव्हता आनं जरांगे दादा जरा त्याच्यावर बोलले की काळा दिवस ते तुळजापूरचं म्हणलं नशीब लोकसभेला दारुण पराभव झाला नाहीतर तुमच्या नशिबी धनुष्य बाण घेऊन पोरगाच व्हता,काय म्हणतं ओ ते (मल्हार पाटील) आमच्या रक्तात घड्याळ, हृदयात कमळ तर हातात धनुष्यबान असं म्हणत माजी आमदार राणा जागतितसिंह पाटील यांच्या वर टीका करताना आम्ही घराणेशाही न करता सर्व सामान्य शेतक ऱ्याचा मुलगा कैलास पाटील यांना उमेदवारी दिल्याचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले.शनिवारी (ता.१६) रात्री आठ वाजता महायुतीचे उमेदवार माजी आमदार कैलास यांच्या प्रचारासाठी महायुतीचे स्टार प्रचारक खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते..यावेळी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार बापू सस्ते,हनुमंत आव्हाड,रामलिंग आव्हाड,अनिल पवार,तुषार वाघमारे,माजी पं.स. सदस्य रामहरी मुंडे,नेताजी जावळे,भारत सांगळे, गजानन नलावडे,शाम देशमुख,प्रशांत धोंगडे,खंडू भातलवंडे,विलास थोरबोले अनिल पवार,चरण पाटील, मारुती देशमुख,राहुल पाटील, सागर बाराते,मनोहर धोंगडे,संदीप पायाळ,बालाजी भातलवंडे,समाधान बाराते, राजेंद्र बाराते,दिलीप बाराते, अक्षय बाराते, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.