मतदानासाठी जात असालं तर हे सोबत न्यावं लागतंय !

तेरणा काठ वृत्तसेवा
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता भारत निवडणूक आयोगाने दिलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र जे मतदार मतदानाच्या वेळी सादर करू शकत नाही,अशा मतदारांना मतदानाच्या वेळी मतदार म्हणून त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त १२ प्रकारचे कागदपत्रे मतदानाच्या वेळी ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. यामध्ये आधारकार्ड,मनरेगाचे रोजगार पत्रक,बँक/पोस्ट ऑफिसने दिलेले छायाचित्रासह पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवाना,पॅन कार्ड,रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट,फोटोसह पेन्शन दस्तऐवज,केंद्र/ राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. या ओळ्खपत्रावर देखील मतदार म्हणून मतदान करता येणार आहे.असे जिल्हा निवडणूक विभागाने कळविले आहे.