ताज्या घडामोडी

श्री साई श्रध्दा एज्युकेशनच्या वतीने कु. आकांक्षा झोंबाडेचा बीडीएस प्रवेश मिळाल्याबद्दल सत्कार

धाराशिव शहरातील आकांक्षा झोंबाडेचा लातूर येथील एमआयडीएसआर काॅलेज मध्ये बीडीएसला प्रवेश मिळाल्याबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. आकांक्षा ही बील गेट्स काॅलेज धाराशिव येथून चांगल्या गुण घेऊन विषेश प्राविण्यासह बारावी विज्ञान उत्तीर्ण झाली आहे. तिने श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज मधून नीटची तयारी करून पुढे प्रा. सोमनाथ लांडगे सर यांच्या मार्गदर्शनातून अ‍ॅडमिशन काउन्सलिंग प्रक्रिया पार करण्यात आली. तिचा या यशाबद्दल तिचे वडील  पोपटराव झोंबाडे, आई सुलोचना झोंबाडे, भाऊ अशिश झोंबाडे यांच्या सह नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री साई श्रध्दा एज्युकेशनने सत्कार करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री साई श्रध्दा मुलींच्या वस्तीगृहाच्या संचालिका सौ. उषाताई लांडगे उपस्थित होत्या. कु. आकांक्षाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.