संभाजी गिड्डे यांना महात्मा ज्योतिबा फुले समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.

.
..
जयनारायण दरक कळंब
..
कळंब तालुक्यातील मोहा येथील संभाजी गिड्डे यांना महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या लातूर च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार त्यांना संस्थेचे सचिव सुफी सय्यद यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह भ प महादेव महाराज अडसूळ मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड आदी मान्यवर उपस्थित होते. संभाजी यांना या अगोदर वृंदावन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षक हा पुरस्कार देण्यात आला. साने गुरुजी कथा मालेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर गेल्या 27 वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना पत्रकारिते मध्येही अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव डॉ अशोकराव मोहेकर, संस्थेचे संचालक तात्यासाहेब पाटील, कळंब पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. सभापती शेषराव मडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप मडके व भाजपचे जिल्हा समन्वयक शिवाजी गिड्डे यांनी अभिनंदन केले.