ताज्या घडामोडी

बालिका गाडेकर यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.


कळंब/जयनारायण दरक
..
कळंब येथील विद्याभवन हायस्कूल मधील इंग्रजी विषयाच्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका बालिका प्रभाकर गाडेकर यांना महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा राज्य स्तरीय महात्मा ज्योतिबा फुले समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना लातूरच्या माजी नगरसेविका छाया शिंदे, संस्थेच्या मराठवाडा अध्यक्षा उषा धावारे, सिद्धार्थ कवठेकर, अच्युत माने, डॉ. खाजा शेख, जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी ॲड वर्षा खोडसे भिसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मराठवाडा अध्यक्षा उषा धावारे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सचिव सुफी सय्यद यांनी केले.
हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार, उपमुख्याध्यापिका सरला खोसे पाटील, पर्यवेक्षक दिगंबर खामकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.