कळंब तालुक्यातील नाथवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस जिल्हाधिकारी व सीईओ यांची एकत्रित येऊन तपासणी
गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रमाचे कौतुक

तेरणा काठ वृत्तसेवा —
कळंब तालुक्यातील नाथवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवत्ता विकास या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी भेट देवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेतील भौतिक सुविधांची तपासणी करून समाधान व्यक्त केले .
दिनांक २६ बुधवार रोजी नाथवाडी च्या जि.प. प्राथमिक शाळा व विद्यार्थी गुणवत्ता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी तपासणी केली यामध्ये शाळेमधील किचन शेड, वृक्षारोपण शाळेचा परिसर व विद्यार्थ्यांसाठीच्या इतर सर्व भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचे मराठी वाचन घेऊन विद्यार्थांचे संख्या ज्ञान व संख्या वरील क्रिया व इंग्रजी वाचन तपासले व गणिती क्रिया करायला लावल्या . विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शालेय परिसर यावर समाधानी होऊन शाळेच्या मुख्याध्यापिका शितल सोळुंके व शिक्षीका श्रीमती. प्रतिभा लोकरे ,अंगणवाडी सेविका अनिता बाराते यांना पुस्तक भेट देऊन त्यांना जिल्हाधिकारी पुजार यांनी सन्मानित केले .
नाथवाडीच्या शाळेने प्राथमिक शिक्षक संघाच्या गुढी पाडवा, पट वाढवा या संकल्पनेतुन गावामध्ये प्रवेश दिंडी काढून, घरोघरी जाऊन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व सी ई ओ यांच्या हस्ते पुष्पहार व साखरेचा हार देऊन शाळेमध्ये स्वागत केले .
यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे , डायट अधिव्याख्याता उमेश नरवडे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, येरमाळा बीटचे विस्तार अधिकारी माळी, देवकुळे, येरमाळा केंद्रप्रमुख अनिल बारकुल , गौर केद्रप्रमुख रवि शिनगारे, सरपंच शितल अमरसिंह डोके तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,नाथवाडीचे ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .