ताज्या घडामोडी

भांडाफोड होत असल्याचे दिसून येताच पोलीसांचा पलटवार:

येरमाळा (प्रतिनिधी) महामार्गावरील गुटखा वाहतुक करणारी गाडी अडवली का अडविण्यास सांगितली.हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला असून भांडाफोड होत असल्याचे दिसून येताच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
गाडी अडविणारे पारधी समाजाचे तरुण आणि पोलीस यांच्यात झालेल्या हुज्जतमुळे पोलिसांवर गाडी लुटण्यास संगितल्याचा आरोप होत असल्याने प्रकरण नेमके काय या बाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. पारशी समाजातील तरुणांना हाताशी धरून, शुक्रवारी रात्री तेरखेडाजवळ गुटख्याने भरलेला एक टेम्पो पकडला, नंतर गुटखा तस्करी करणाऱ्या लोकांबरोबर ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून टेम्पो सोडून देण्याच्या बेतात असताना, पारधी तरुणांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केली, तेव्हा पोलीस व तरुणात कलह निर्माण झाला आरोपींनी पोलिसांशी चोरी दरम्यान हुज्जत घातल्याने शासकीय कामात अडथळा केल्याने दहा ते पंधरा लोकांवर गुन्हा नोंद केला असुन गाडी चालकाविरुद्ध प्रतिबंधित गुटखा वाहतुकीचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असला तरी,वाहन चालकाला मारहाण करुन खिशातील रोख रक्कम १५ हजार हिसकावून गाडीतील माल चोरी गेल्या प्रकरणी तेरखेडा लक्ष्मीपारधी पिढीवरील संतोष लाला काळे,प्रशांत उर्फ सचिन बापू पवार,दत्ता दादा काळे,किरण बापू काळे,संतोष राजेंद्र शिंदे.यांच्यावर दरोडा प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनावर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.