ताज्या घडामोडी

पंधरा दिवसात दोन वेळा पेट्रोल पंपावर दरोडा:: चोरट्यांचा धुमाकूळ

कळंब/जयनारायण दरक-

————– कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील पेट्रोल पंपावर मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यावर कोयत्याचा धाक दाखवून 70 हजार रुपये लुटल्याची ची घटना शुक्रवारी पहाटे घडली कळंब ते येरमाळा महामार्गावरील मस्सा (खं) येथील समर्थ पेट्रोल पंपावर अंधाराचा फायदा घेत चार चोरटे पंपाच्या ऑफिसमध्ये शिरले तोंड झाकून घेतलेल्या या दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून पंपावरील कर्मचारी रामराजे लिंबराज ढेपे, बालाजी दिगंबर थोरात यांना उठवले यानंतर दरोडेखोराने कोयता काढून मारण्याची धमकी देत ऑफिस मधील 70 हजार रुपयाची रोकड व दोन मोबाईल ताब्यात घेत दरोडेखोराने येरमाळ्याच्या दिशेने पळ काढला या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपाधीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे, बाळासाहेब तांबडे, गणेश वाघमोडे, पोपट जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला व घटनास्थळी सश्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच कळंब शहरालगत असलेल्या एका पेट्रोल पंपावरील चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून मोठी रोकड पळविली होती अद्याप या घटनेचा तपास लागला नसताना ही दुसरी घटना 15 दिवसाच्या आत घडली याप्रकरणी कर्मचारी रामराजे ढेपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पेट्रोल पंपाच्या आवारात पुरेसा प्रकाश उपलब्ध नसल्यामुळे दरोडेखोरांना आत शिरण्यास सोयीस्कर झाले ऑफिसमध्ये शिरल्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून रक्कम कशी लुटली याचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या आधारे पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.