छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा

– येरमाळा येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सात दिवस चालणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव येरमाळा यांच्या वतीने दिनांक 18 रोजी समाजातील आठरा पगड जातीतील एक -एक प्रतिनीधी च्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली . दिनांक 19 रोजी सकाळी 9 वाजता शिवरायांच्या मुर्तीचे पुजन ज्ञानदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर, जि .प . प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल बारकुल सर, आणि शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष देवानंद बारकुल यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी. राहुल पाटील,धनंजय बारकुल, सुनिल बारकुल, अमोल बारकुल,बालाजी बारकुल, समाधान बारकुल, अमर बारकुल,, बावळे सतिष मुन्ना मोरे, विशाल बारकुल आदी उपस्थित होते . सकाळी 9 वाजता शहरातील बाल शिवभक्तांनी संपुर्ण शहरांतुन अतीशय शिस्तबद्ध अशी पालखी रॅली काढली यावेळी बाल शिवभक्तांनी भगवे फेटे घालुन हातात झेंडे घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते यामुळे शहरांतील वातावरण भगवेमय दिसत होते. या पालखी रॅली मध्ये जि.प .प्राथमिक शाळा, ज्ञानोद्योग विद्यालय, विद्यानिकेतन विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . यामध्ये विद्यार्थ्यांनी झांज पथक, लेझीम पथक, ग्रुप डान्स करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले . त्याचबरोबर जि.प .प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजीराजांची, राष्ट्रमाता जिजामाता यांची वेशभुषा करून आणि कांही विद्यार्थ्यानी मावळ्यांची वेशभुषा करून ग्रामस्थांचे लक्ष वेधले . बाल कलाकारांना व रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जागोजागी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली . शिवजन्मोत्सव मंडळाकडून दिनांक 21 रोजी ग्रामपंचायत समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन रक्तदात्यास एक आकर्षण भेट वस्तु देण्यात येणार आहे त्यानंतर दि. 22 रोजी सायंकाळी सात वाजता युवा व्याख्याते गणेश शिंदे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत युवकांनी सहभाग घ्यावा तसेच व्याख्यानाचाही लाभ घ्यावा असे आवाहन शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .