विविध सामाजिक,आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांनी डि.व्ही.पी. उद्योगसंमुहाचे अध्यक्ष अभिजित (आबासाहेब) धनंजय पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

तेरणा काठ न्युज
चोराखळी- डि.व्ही.पी. उद्योग समुहाचे अध्यक्ष व विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे ता. पंढरपुरचे विद्यमान चेअरमन अभिजीत (आबासाहेब) चनंजय पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. येडेश्वरी देवस्थान येरमाळा व पापनाश देवस्थान चोराखळी येथे अभिजित पाटील यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आले, कारखाना साईटवर २०० चिंच व २०० सागवान वृक्षारोपन करण्यात आले, जि.प. प्राथमिक शाळा कारखाना साईट, चोराखळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप तसेच स्वाधार केंद्र गुळणी, येथे प्रितिभोज आयोजन, कारखान्यातील कर्मचा-यांच्या भरगोस – प्रतीसादात रक्तदान शिबीर संपन्न झाले. यासाठी श्री. भगवंत ब्लड बैंक, बार्शी व सह्याद्री ब्लड बैंक, उस्मानाबाद यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रमुख पाहुणे. प्रा. सुनिल पाटील (येरमाळा) गणेश जगदाळे (भगवंत ब्लड बैंक, बाशी), शशिकांत करंजकर (सह्याद्री ब्लड बैंक धाराशिव), जनरल मॅनेजर पठाण साहेब, चिफ केमिस्ट. साळुंके साहेब, चिफ इंजिनीअर . वैभव देशमुख साहेब, चिफ अकौंटंट प्रविण बोबडे, चिफ फायनान्स ऑफिसर .बाबासाहेब वाडेकर, मुख्य शेतकी अधिकारी. दयानंद गव्हाणे, डिस्टीलरी मॅनेजर .ज्ञानेश्वर कोळगे, ई.डी.पी. मॅनेजर.सुनिल लोमटे, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडले.