ताज्या घडामोडी
भूम तालुक्यातील रामकुंडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकशाही पद्धतीने बालसंसद निवडणूक

तेरणा काठ न्युज –
विद्यार्थ्यांत लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी. मतदानाचा अधिकार कसा असतो याची माहिती होण्यासाठी पिरामल फाऊंडेशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार जि.प. रामकुंड ता.भुम शाळेत लोकशाही पद्धतीने बालसंसद निवडणूक अतिशय उत्साहात पार पडली .
येथील. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आकाश साबळे शाळेचा मुख्यमंत्री म्हणून विजयी झाला.पुढे मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. मतदान अधिकारी म्हणून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले कार्य पार पाडले . श्रीम. कुटे एम.सी., श्रीम. गायकवाड जे.एस., श्रीम. राठोड ए.एस. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पिरामल फाऊंडेशनच्या गांधी फेलो सदाफ व कोमल शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.