कै.आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा
येरमाळा येथे कै.आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कैलास पाटील होते यावेळी आयएएस (304 रँक) . पुष्पराज खोत , तहसीलदार शिवानंद बिडवे, तहसीलदार. सुहास हजारे यांची उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कै.आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्याच वर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून. कै.अबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठान येरमाळा वतीने दरवर्षी कै. आनंदराव भगवानराव पाटील यांचे स्मरणार्थ येरमाळ्यातून इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्याला 5001 रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले या वर्षी सानवी सुखदेव बारकुल या विद्यार्थ्यीनीस पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल बापूसाहेब पाटील आणि . शिवसेना विभागप्रमुख राहुल रामराव पाटील यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.