ऍड.तेजश्री पाटील या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

तेरणा काठ वृत्तसेवा –तेजस्विनी फाउंडेशन उस्मानाबादच्या सचिव तेजश्री पाटील यांना लातूर येथील दयानंद सभागृहात वकिली व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानव विकास सेवाभावी संस्था गुरधाळ यांच्यावतीने मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे श्रद्धे रमाकांत व्यास, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर गायक डॉक्टर अमरीश महाराज देगलूरकर संस्थेचे अध्यक्ष सरोजा घोगरे व सचिव वसंत घोगरे आदी उपस्थित होते पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारते वेळी धर्मराज पाटील,सौ सुषमा देवी धर्मराज पाटील, श्रीमती निलावती काळे, सौ.ऐश्वर्या दिवाणे, डॉ. हेमलता देसाई, आनंद पाटील,, रणजीत पाटील, निशिकांत पाटील,सौ कविता पाटील,कु. जया पाटील, कु. काव्या पाटील, श्रीमती. सविता काळे. उपस्थित होते