ताज्या घडामोडी
येरमाळा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास जिल्हाधिकारी यांची भेट

तेरणा काठ वृत्तसेवा —
श्री येडेश्वरी यात्रा पौर्णिमेनिमित्त आढावा बैठकीसाठी आलेले धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी येरमाळा येथील शासकीय आयुष्यमान आरोग्य केंद्रास भेट दिली यावेळी रुग्णांना मिळत असलेली व त्या ठिकाणची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ .मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ .मिटकरी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.दवाखान्यातील सर्व कर्मचारी वर्गानी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याने चोख व्यवस्था केली होती. येरमाळा पीएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर बिरादार ,डॉ.सचिन तेलप यांनी सर्व वरिष्ठांचे स्वागत केले.यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.