ताज्या घडामोडी

जुने अभिलेखे मिळणार ऑनलाईन

तेरणा काठ वृत्तसेवा —
महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या 100 दिवसाचे कृती आराखड्यातील 7 कलमी कार्यक्रमाचे अनुषंगाने कळंब तहसील कार्यालयातील अभिलेख विभागाकडे उपलब्ध असलेल्या जुन्या दस्तऐवजापैकी 1.7/12 उतारे 2. खासरा पत्रक 3. पाहणी पत्रक 4. जन्म मृत्यु नोंदवही उतारे 5. कुळ विभागाकडील अभिलेखे 6. व इतर महसुली अभिलेखे यांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झालेले असून सदरचे अभिलेखे संगणकीय प्रणालीव्दारे स्वाक्षरी करुन नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.सदरचे अभिलेखेhttps://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/Login या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तेंव्हा या व्दारे सर्व जनेतेमेस आव्हान करण्यात येते कि, वरील संकेतस्थळावरुन घर बसल्या सर्व जुने अभिलेखे विना शुल्क पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता. संगणकीय प्रणालीव्दारे स्वाक्षरी केलेले जुने अभिलेखे शासनाने निश्चित केलेले शुल्क ऑनलाईन भरना करुन प्राप्त करुन घेता येतील.याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा.असे कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.