ताज्या घडामोडी

पोलीस दलात भरती झालेल्या युवकांचा दुथाळवाडीत आ.कैलास पाटील यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा. कळंब तालुक्यातील दुधाळवाडी गावातील अमर लाटे यांची राज्य पोलीस राखीव दल व वैभव सोन्नै यांची केंद्र पोलीस राखीव दलामध्ये, तर रोहित भांगे यांची आर्मी नर्सिंग मध्ये निवड झाल्याबद्दल गावात जंगी मिरवणूक व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सविता शिरसाट होत्या.यावेळी रामहरी बाप्पा मुंडे, सापनाईचे दादासाहेब ताकमोगे,शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील, सुरज बारकुल, संतोष बारकुल, अमोल सर बारकुल, अमर बारकुल, नदीम मुलांनी, मातंग एकता समिती जिल्हाध्यक्ष मल्हारी कसबे,दत्ता कस्पटे, हरिचंद्र लाटे , बालाजी बापू लाटे, ऋषिकेश लाटे, निखिल लाटे, यांच्यासह गावातील युवक, महिला, ज्येष्ठनागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
;;;;;;गोविंद मुंडे व भिवाजी शिरसाट यांच्या पुढाकाराने गावातील युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम;;;;;;;;;;;
दुधाळवाडी हे गाव जवळपास सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेले गाव. गावातील लोक शेती व दुग्ध व्यवसायावर जास्तीत जास्त अवलंबून आहेत गावात शिक्षणाचं प्रमाण फार कमी प्रमाणात आहे. असून या तिन्ही युवकांनी मिळवलेल्या यशामुळे गावातील युवकांत अभ्यासाविषयी तसेच स्पर्धा परीक्षा विषयी उत्साह निर्माण व्हावा व नवनवीन संधी मधून यश संपादन करावे.व गावाचे नाव उज्वल करावे, युवकांना योग्य दिशा मिळावी या भावनेतून गोविंद मुंडे व भिवाजी शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल लाटे यांनी केले, तसेच सूत्रसंचालन डॉ निलेश लाटे यांनी केले, आभार प्रदर्शन गोविंद  मुंडे यांनी मानले.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.