ताज्या घडामोडी

येरमाळा येथे शिवजयंती निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा आनंदात संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा 
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव येरमाळा 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा व ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा आनंदात संपन्न झाल्या
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र पर विविध प्रकारच्या नाटिका तसेच नृत्य व लोककला यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं या विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे मन उल्हासित झाले सायंकाळी 9 ते 12 यादरम्यान शिवकालीन कला वाघ्या मुरळी पथकाच्या माध्यमातून शिवचरित्र गायन हा कार्यक्रम संपन्न झाला व शिवजन्मोत्सव निमित्त शिवजन्मावर आधारित पाळणे येरमाळ्यातील महिलांनी गायले यावेळी येरमाळ्याच्या प्रथम नागरिक सरपंच सौ प्रिया विशाल बारकुल, सौ उषा अमोल बारकुल, सौ उज्वला गोरख बारकुल, सौ सुषमा अमोल बारकुल सौ ज्योती औदुंबर बारकुल, यांच्यासह महिला उपस्थित होत्या . ग्रामस्थांनी जयघोषात व आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष प्रवीण बारकुल आतिश बारकुल ,अमोल बारकुल , गोरख बारकुल काकासाहेब बारकुल, प्रितेश बारकुल तेजस बारकुल ,रामेश्वर चौधरी ,शुभम बारकुल, बालाजी बारकुल, गणेश पवार , यांच्यासह येरमाळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.