दत्तजयंतीनिमित्त मलकापूरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

तेरणा काठ न्युज
ह.भ.प. सुभाष महाराज यांच्या वास्तव्याने मलकापूर क्षेत्र पावन भूमी असून दत्त जयंती निमित्त मलकापुर येथे दि. ८ डिसेंबरपासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरुवात दि.८ रोजी सकाळी मलकापूरच्या प्रथम नागरिक रुक्मीणी घोळवे, आबासाहेब लोमटे, राजेश लोमटे यांच्या हस्ते कलश पूजन करून होईल. विना पुजन दत्ता पाटील, नरसिंग लोमटे तर टाळ व मृदंग पुजन एकनाथ विठ्ठल लोमटे व पाशाभाई सय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मलकापूर येथील दत्त जयंतीच्या निमित्त होणाऱ्या या सप्ताहाचे ४२ वे वर्ष असुन त्याची सुरुवात वैकुंठवासी ह.भ.प. सुभाष महाराज यांनी केली आहे. या सप्ताहामध्ये दररोज रात्री ९ वाजता किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये अनुक्रमे ह.भ.प. विष्णु महाराज पंढरपूर, ह.भ.प. नाना महाराज कदम नेकनुर, ह.भ.प. माधव महाराज बोधले गौर, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज काकडे हावरगाव, ह.भ.प. ॲड. पांडुरंग महाराज लोमटे, यांचे किर्तन होणार असुन ह.भ.प. वैजीनाथ महाराज उस्तुरे औसा यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. कळंब आणि धाराशिव तालुक्यातील अनेक गावातील भजनी मंडळ या उपस्थित राहणार असुन सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहासाठी व महाप्रसादासाठी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्याध्यक्ष ह.भ.प. एकनाथ महाराज लोमटे यांनी केले आहे.