वाशी तहसील कार्यालयाने निराधारांना पेन्शन तात्काळ देण्याची रामभाऊ लगाडे यांची मागणी

तेरणा काठ वृत्तसेवा
वाशी तालुक्यातील निराधार व श्रावणबाळ योजने सह अन्य योजनेतील लाभधारकांची पेन्शन तहसिलदार यांनी तात्काळ द्यावी अशी मागणी जाणिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. वाशी तालुक्यातील दहा हजाराहून अधिक लोक संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदी योजनेची पेन्शन शासनाकडून दिले जाते. परंतु तहसील कार्यालयाकडुन दिपावळीच्या सणाला सुद्धा गोर गरिबांना पेन्शन वाटप करण्यात आली नाही. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली असल्याने या अगोदर तरी पेन्शन देतील अशी अपेक्षा लाभार्थ्यांना वाटली होती. परंतु तहसील कार्यालयाकडुन या लाभधारकांकडे साफ दुर्लक्ष केले व पेन्शन वाटप केली नाही. दिवाळी गेली सद्यस्थितीत निवडणूकही संपली आहे. तरी सुद्धा वृद्ध निराधार हे पेन्शनच्या आपेक्षेवर जगत आहेत. त्या मुळे आता तरी तहसीलदार यांना जाग येईल का?असा सवाल गोरगरीब, वृद्ध, निराधार, विधवा, परितक्त्या, दुर्बल घटकातील नागरीकांना प्रश्न पडला आहे? त्या मुळे संबंधीत वाशी तालुक्यातील निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभधारकांची पेन्शन तात्काळ वाटप करावी. अन्यथा सदरील मागणीवर तहसील कार्यालयाकडुन दुर्लक्ष केल्यास जाणीव संघटनेच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर लोकशाही मार्गाने तीव्र धरणे आंदोलन करण्यात येतील असा इशारा जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी दिला आहे.