ताज्या घडामोडी

येडेश्वरी देवस्थानास तीर्थक्षेत्र ब दर्जा तरीही उपेक्षितच

तेरणा काठ वृत्तसेवा —
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित व नवसाला पावणारी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी देवस्थानाला शासनाचा तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळाला असला तरी विकासापासून वंचितच असल्याचे दिसत आहे
चैत्र पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने भरणारी श्री येडेश्वरी देवी यात्रेच्या महिनाभर आधी प्रशासन जागे होते परंतु निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या पुण्याईने पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती पहावयास मिळते. आलेले भाविक असणाऱ्या अडचणीत मार्ग काढून देवीच्या पालखीवर चूना वेचून देवीची यात्रा पार पाडतात.आणि लागलीच आपल्या गावची वाट धरतात.
भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरून सध्या केवळ महावितरण कंपनीच फक्त ॲक्टिव्ह मोडवर असून बाकीचे सर्व विभाग काहीच काम करताना दिसत नाहीत.वीजेसोबत रस्त्याचा प्रश्नही गंभीर आहे. येडेश्वरी देवी. मंदिराकडे जाणारा रस्ता मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खड्डामय झाला आहे.त्याचे कामं होणं अपेक्षित आहे.जो रस्ता झाला अगदी चार महिन्यांतच डागडुजीवर आला यातून गुत्तेदाराने किती प्रामाणिकपणे काम केले हे दिसून येत आहे.तसेच यंदा पाणी पातळी चांगलीच खालावली आहे.त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असुन प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
श्री येडेश्वरी देवस्थानास शासकीय ब दर्जा मिळाला असा गाजावाजा गतवर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता परंतु ब दर्जा लेवलची यंत्रणा कार्यरत नसल्याने शासकीय स्तरावर आर्थिक तरतूद करण्यात आली नाही.असे चित्र स्पष्ट दिसत आहे.तहसिलदार हेमंत ढोकले हे नवखे असून त्यांची काम करण्याची उमेद चांगली आहे त्यांनी ग्रामपंचायत व इतर यंत्रणाही कार्यरत करून येणाऱ्या भाविकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी गावातील व परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.