ताज्या घडामोडी

येरमाळा येथील विद्यानिकेतन प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘पहिलीसाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा –विद्यानिकेतन प्री-प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता पहिलीसाठी प्रवेश वाढवा या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  सचिन पाटील होते. नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती सांगितली”बदल हा काळाची गरज आहे” हे पटवून देत विद्यालयाच्या वैशिष्ट्यांवर सचिन पाटील यांनी प्रकाश टाकला. त्यांनी “शाळा आपली शाळा कशी वेगळी आहे” याबद्दल माहिती देताना, शिक्षकवृंदाच्या मेहनतीची ओळख करून दिली. तसेच, शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर आधारित शिक्षण प्रणाली, शंभर टक्के गुणवत्तेची हमी, कमी फी आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी यांसारख्या शाळेच्या विशेष वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली.तसेच पालकांना मार्गदर्शन केले आणि आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योग्य शाळेची निवड कशी करावी, याविषयी माहिती दिली. त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.विशेष म्हणजे, सुंदर हस्ताक्षरासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. तसेच, ही शाळा इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत आहे, जेणेकरून विद्यार्थी लहान वयातच स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीशी परिचित होतील आणि उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम होतील.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक. सतीश पाटील सर, तुषार रुमणे, मनोज जाधवर, प्रवीण बारकुल, संदीप ढवळे, आश्विनी बारकुल, सुनीता बारकुल, वाघमारे सर आणि प्रशासकीय अधिकारी अनिल डोके सर यांची  उपस्थिती होती.तसेच, विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक.टेकाळे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोन मिळाला. या शाळेत इयत्ता पहिलीसाठी तब्बल 200 विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली असून, उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. हा यशस्वी प्रतिसाद फक्त कृतीयुक्त शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांकडे दिल्या जाणाऱ्या विशेष लक्षामुळे मिळाला आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा पवार, फीजा पठाण, माळी अंजली, ज्ञानेश्वरी बारकुल यांनी मोलाचे सहकार्य केले.., ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन शाळेला 2 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाळवदे मॅडम यांनी केले, तर प्रस्ताविक विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य प्रियंका पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन वाघमारे मॅडम यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.