ताज्या घडामोडी

येरमाळ्याच्या सरपंचपदी चौंद्यादां महिलाच::प्रिया बारकुल यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

तेरणा काठ वृत्तसेवा 
येरमाळा ग्रामपंचायतीवर माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल यांचे गेल्या वीस वर्षांपासून एक हाती वर्चस्व आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत खुल्या महिला प्रवर्गाला आरक्षण होते. निवडणुकीत भाजपाचे विकास बारकुल यांच्या गटाने विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी पॅनल विरुद्ध १३/० अशी एकहाती निवडणूक जिंकली होती. निवडून आलेल्या खुल्या प्रवर्गातील चार महिलांना सव्वा-सव्वा वर्षे सरपंच पद देण्याचे विकास बारकुल यांनी जाहीर केले यामध्ये.पहिल्यांदा तबसूम रफिक सय्यद यांना दुसऱ्यांदा सुजाता श्रीकांत देशमुख यांना तर तिसऱ्या वर्षी मंदाकिनी आबासाहेब बारकुल यांना तर कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रिया विशाल बारकुल यांना ठरल्या प्रमाणे सरपंच पदाची संधी देण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी एन.डी.नागटिळक यांनी तर सहकारी म्हणुन तलाठी एस.व्ही.गायकवाड,एम. व्ही.नागरे यांनी काम पाहिले.
या वेळी जेष्ठ नेते प्रा.आबासाहेब बारकुल,भाऊसाहेब बारकुल, विकास बारकुल,माजी सरपंच मुरहरी कांबळे, उपसरपंच गणेश बारकुल,प्रा.संतोष तौर,महावीर अचलारे,चेअरमन रामकिसन बारकुल येरमाळा पत्रकार संघांचे अध्यक्ष सचिन बारकुल,कुंदन कांबळे,जाफर शेख,ग्रामपंचायत सदस्य शिवहार मनगिरे,विलास बारकुल,शंकर कांबळे, शब्बीर आतार उपस्थित होते.
प्रिया बारकुल यांचा सरपंचपदाच्या निवडी नंतर माजी सरपंच,तबसूम सय्यद,मंदाकिनी बारकुल सदस्या नंदुबाई कसबे, वनमाला कळसाईत,राजश्री शेटे यांनी शाल,श्रीफळ,पुष्पहार घालुन सत्कार केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.