ताज्या घडामोडी
डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुधीर लोमटे यांची तर सचिवपदी बालाजी बारकुल यांची निवड

तेरणा काठ वृत्तसेवा
डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या व सर्व घटकांचे हित जपण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत असलेल्या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुधीर लोमटे व तालुका सचिवपदी बालाजी बारकुल यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्य संघटक इक्बाल शेख व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंघे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघाचे काम राज्यभर सुरू आहे.तसेच तालुका उपाध्यक्ष सतीश पवार कार्यकारिणीत सचिन बारकुल,दत्ता बारकुल, दत्ता गायके, दिपक बारकुल, मिलिंद देशमुख,तानाजी बारकुल, सुखदेव गायके, याची निवड करण्यात आली आहे.