ताज्या घडामोडी

डॉ. अशोक शिंपले सरांना नेशन बिल्डर अवॉर्ड जाहीर

धाराशिव : जि. प. बॉइज हायस्कूल, कळंब येथे कार्यरत असलेले व विविध सामाजिक चळवळीतील अग्रेसर असलेले डॉ. अशोक साहेबराव शिंपले सर यांना रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने देण्यात येणारा नेशन बिल्डर अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने सप्टेंबर महिना हा साक्षरता महिना म्हणून साजरा करण्यात येतो या महिन्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यात कार्यरत असणाऱ्या गुणी विद्यार्थीप्रिय, नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परिक्षेची, खेळाची तयारी करून घेणाऱ्या सन्माननीय शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देवून सन्मान करुन त्यांचा यथोचित गौरव केला जातो. सन २०२३ च्या रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या नेशन बिल्डर अवॉर्डसाठी डॉ. अशोक शिंपले यांची निवड करण्यात आली आहे.
या पूर्वीही डॉ. अशोक शिंपले यांना विविध सामाजिक संस्था व शासनाकडून पुरस्कार देण्यात आलेले आहेत. सरांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशन नीट ऑनलाईन टेस्ट सीरिज चे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. संतोष पाटील यांनी
त्यांचे अभिनंदन केले. त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून त्यांना शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी जयभवानी फंक्शन हॉल, परळी रोड, कळंब, जि. धाराशिव येथे सायं. ७:०० वाजता एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.