ताज्या घडामोडी

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 4 ऑक्टोबर रोजी येरमाळ्यात होणार भव्य स्वागत

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अहोरात्र काम करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची 4 ऑक्टोबर रोजी येरमाळा येथे संवाद यात्रा येणार असून त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य स्वागत व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
येरमाळा येथे आल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत बस स्टॅन्ड समोर होईल, रोडच्या दोन्ही बाजूने दोन जेसीपी द्वारे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाईल, वाजंत्री पथक पुढे चालेल आणि तेथून चालत ग्रामपंचायत समोरून सभेचे ठिकाण असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर सभा होईल
या काळात खालील प्रमाणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे
1) *बार्शी कडून येणाऱ्या लोकांसाठी पार्किंग ची सोय ज्ञानद्योग विद्यालयाच्या पाठीमागील ग्राउंड*.
2) *येडशी कडून येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची सोय सरस्वती विद्यालयाचे ग्राउंड*.
3) *तेरखेडा व कळंब कडून येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची सोय पलंगे प्लॉटिंग, पोलीस स्टेशन समोर.*
सभेच्या ठिकाणी पाच ते सात हजार लोक बसतील असे नियोजन करून सभेच्या ठिकाणी सर्वांना चहाची व पाण्याची व्यवस्था केली असल्याचे सर्व सकल मराठा समाज बांधव येरमाळा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सभा झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या शहाजी कदम च्या कुटुंबाची भेट घेतली जाणार आहे.
.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.