ताज्या घडामोडी
येरमाळा येथील येडेश्र्वरी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याचा पुण्यात सत्कार

केंद्र शासनाच्या NMMS परीक्षेत उत्कृष्ठ यश प्राप्त केल्यामुळे सनवी सुखदेव बारकुल,अंतरा संतोष जाधव आणि विभावरी अविनाश जाधव यांचा आणि क्लासेस चे संचालक मार्गदर्शक संतोष आगलावे सर यांचा पुण्यात वृंदावन फाउंडेशन च्या वतीने *उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार* हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केंद्रीय पेट्रोलियम राज्य मंत्री रामेश्वर जी तेली यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी वृंदावन फाऊंडेशन चे संचालक, व पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते