ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे आई राजा उदो… उदो,…. च्या गजरात रोकडेश्वरी देवीची घटस्थापना

कळंब/ जयनारायण दरक———————

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथिल आराध्य दैवत रोकडेश्वरी देवीची घटस्थापना दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कळंब तहसील चे नायब तहसीलदार सांगळे
व ,शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याण नेहरकर, सिद्धिविनायक ग्रुपचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते देवीची पुजा व घटस्थापना करण्यात आली.
या वेळी खामसवाडी सज्जाचे तलाठी माळवदकर , सरपंच आमोल पाटील व अशोक त्रिंबकराव शेळके, याञा कमिटीचे अध्यक्ष ज्योतिसिंग राठोड उपआध्यक्ष निलेश पाटील, सचिव प्रभाकर शेळके, कमिटीचे सदस्य ,धनंजय शेळके, अमर शेळके,सतिश माने, विजय शेळके, फुलचंद सावत,सादिक सय्यद, महादेव शेळके, देवीचे पुजारी शहाजी डोईफोडे यांच्या सह भक्ताच्या उपस्थितीत आई राजा उदो..उदो… च्या गजरात घटस्थापना करण्यात आली.
घटस्थापना झाल्यानंतर पुजेसाठी आलेले नायब तहसिलदार श्रीकिशन सांगळे , शिराढोण पोलिस ठाण्याचे स.पो.नि कल्याण नेहरकर व दत्ताभाऊ कुलकर्णी, मंडळ अधिकारी माटे, खामसवाडी सज्जाचे तलाठी माळवदकर, व पोलीस पाटील विक्रम पांचाळ यांचा याञा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्योतिसिंग राठोड यांनी असे आवाहन केले की, रोकडेश्वरी देवीची यात्रा व नवरात्र महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार असल्यामुळे परिसरातील देवी भक्तांनी याञेत सहभागी होऊन रोकडेश्वरी देवीची नवरात्र यात्रेची शोभा वाढवावी. असे आवाहन करण्यात आले. तर
रोकडेश्वरी देवीची घटस्थापना मोठ्या उत्साहाने आई राजा ऊदो… ऊदो…च्या गजरात केली असुन नऊ दिवस ढोल ताशाच्या तालावर लेहजीम खेळत-खेळत गावातुन देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. या मध्ये दोन लेहजीम पार्टी चा समावेश असतो. या मध्ये अंबिका लेझीम मंडळ व जगदंबा लेहजीम मंडळ असे दोन मंडळे सात दिवस लेहजीम खेळतात. गावातुन देवीची पालखीत मिरवणूक काढुन अष्टमीला बोलके देखावे करून ऐतिहासिक व पौराणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक असे वेगवेगळे बोलके देखावे करून त्या देखाव्याची पालखीसह गावातून मिरवणूक काढली जाते. नवमीला मोठी यात्रा भरली जाते. तरी परिसरातील देवी भक्त मोठ्या उत्साहाने हा नवरात्र उत्सव पार पाडतात. तर नवमीला मोठी यात्रा भरणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे सचीव प्रभाकर शेळके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.