सापनाई येथील मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरात ५१५ नेत्र रुग्णाची तपासणी

कळंब :- आदर्श फाउंडेशन मुंबई व गुणवंत कामगार मध्यवर्ती संघटना मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सापनाई तालुका कळंब येथे दिनांक १५ व १६ मे रोजी दोन दिवसीयमोफत भव्य नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर संपन्न झाले याप्रसंगी बोलताना गुणवंत कामगार मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बाडकर यांनी ग्रामीण भागातील वृद्ध माता, पिता यांच्या आरोग्याकडे मुलं दुर्लक्ष करीत आहे नेत्र रोग रुग्णाचे प्रमाण मोठे आहे याकडे लक्ष वेधले यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज प्रतिपादन केली या शिबिरात ५१५ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली व ४४५ लोकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले आदर्श फाउंडेशन मुंबई ही सेवाभावी संस्था असून संस्थेच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबिर ,नेत्र तपासणी शिबिर ,अवयवदान ,ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी मदत कार्य तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आदर्श फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष व आयोजक सापनाई चे मूळ रहिवाशी श्रीराम पुराणिक, गुणवंत कामगार मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बाडकर, राज्य गुणवंत कामगार संघटनेचे सचिव अच्युतराव माने ,प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. पि.एम.गर्ग ,डॉ.जे.मेरी यांची उपस्थिती होती शिबिरासाठी सापनाई परिसरातील दहिफळ, मलकापूर नाथवाडी, संजीतपूर ,शेलगाव, बारातेवाडी या गावातील लोकांनी सहभाग घेतला शिबिर यशस्वी करण्या साठी दादा साहेब ताकमोगे , अशोक सुरवसे ,स्नेहल सुरवसे यांनी परिश्रम घेतले.