ताज्या घडामोडी

ईअर ट्रॅगिग केल्याशिवाय पशुधनाची खरेदी -विक्री करण्यास एक जून पासून प्रतिबंध

ईअर ट्रॅगिग केल्याशिवाय पशुधनाची खरेदी -विक्री करण्यास एक जून पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी केव्हा विक्री करता येणार नाही.
या पशुधनास वैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा ही दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्याकडील लहान मोठ्या सर्व पशुधनाची ईअर टॅगिग करून त्याची नोंद पशुधन प्रणाली ॲपवर लवकरात लवकर करावी, असे आवाहन जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी केले.
राज्यातील सर्व लहान मोठ्या जनावरांना ईअर टॅगिग त्यांची भारत पशुधन प्रणाली वर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, पशुवर्धन, दूध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला आहे.
या निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर, आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची संपूर्ण माहिती, जनावराचे फ्य, लिंग, जात, मिल्फीग स्टेटस आदी अद्यावत करणे आवश्यक आहे.
…… तर सरकारी सुविधा मिळणार नाहीत
१ जून २०२४पासून ईअर टॅगिग व भारत पशुधन प्रणाली वरील नोंदी शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच शासकीय पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. तसेच राज्यांतर्गत जनावराची वाहतूक करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारावर कारवाई करण्यात येणार आहे. जनावराची मालकी हस्तातरण करता येणार नाही. वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधून ईअर टॅगिग करून घ्याव्यात. अशी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी कळवले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.