ताज्या घडामोडी

नवरात्रीचे औचित्य साधून न्यास कार्यालयात गरजु महिलांना साड्यांचे वाटप

धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे आणि मा.सह साह्याक धर्मादाय आयुक्त . बी. डी कुलकर्णी यांच्या स्वयंप्रेरणेतुन . सह्यायक धर्मादाय आयुक्त कार्यालय धाराशिव येथील न्यायाधीश कोरे मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून मंदिरामधील देवीच्या साड्या गरजू महिलांना वाटप करण्यात आल्या.

तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेस ज्या भक्तांनी देवीला ज्या साड्या नेसवलेल्या असतात त्या साड्या गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा उद्देश असल्यामुळे त्या उद्देशाला सार्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न मा.कोरे मॅडम यांनी केला आहे.
नवरात्र महोत्सवाचे निमित्त साधून हा एक आगळावेगळा उपक्रम राबविला. ज्या भक्तांनी देवीला नेसवलेल्या असतात त्या साड्या गरजू लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आटोकाट प्रयत्न .कोरे मॅडम यांनी स्त्रियांचा सन्मान करून नवरात्र मध्ये आदर्श निर्माण केला. समाजापासून वंचित असलेल्या तृतीयपंथी लोकांना तसेच फूटपाथ वर असलेल्या गरजू लोकांना या साड्या देऊन सन्मानित केले
ह्या कार्यक्रमात धर्मादाय मध्ये काम करणारे विधिज्ञांनी पण खूप मोठे सहकार्य केले त्यामध्ये सीनियर विधीज्ञ ॲड डी.जे खोत यांनी संत चरित्र सांगितलें. तसेच ॲड तेजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले,
ॲड पी.डी.देशमुख,ॲड पल्लवी वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,. कोरे मॅडमच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील . अग्नीहोत्री (अधीक्षक). क्षीरसागर,. कणकी, कल्याणी,राठोड, . मुधाळे, . नवले,. वाघमारे,तसेच विधिज्ञ ऍडव्होकेट तांदळे, ऍडव्होकेट साळुंखे ऍड. अरुणा गवई, ऍडव्होकेट ज्योती बडेकर, ऍडव्होकेट सारीक पाटील तसेच सामाजिक कार्यकते सुधाकर बुकन, चव्हाण यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.