ताज्या घडामोडी

दिलीप जाधव चेरेकर याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तात्काळ गुन्हा दाखल करा!

धाराशिव प्रतिनिधी:-लातूर येथील दिलीप जाधव चेरेकर या जातीयवादी हरामखोराने बौद्ध समाजातील महिला व बांधव यांच्या बद्दल अतिशय घाणेरडे लज्जास्पद वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण केले आहे म्हणून त्याच्यावर तात्काळ अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपाई (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे.यावेळी निवेदनात म्हटले आहे की,सोशल मीडिया (इंस्टाग्राम) (Id dilipjadhavpatil)यावरून व्हिडिओ बनवून मीडियावर प्रसारित केला आहे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की घ्रणास्पद वक्तव्य करून शिवीगाळ केली आहे हा व्यक्ती लातूर येथील पोलीस दलात पोलीस मित्र म्हणून काम करतो म्हणूनच याला अशा गोष्टी सुचत आहेत.जाणून बुजून दोन समाजामध्ये भांडण लावले आहे अतिशय खालच्या पातळीत जाऊन बौद्ध समाजाला बदनाम केले अशा नीच प्रवृत्तीच्या या हरामखोरवर त्वरित कडक कारवाई करून पोलीस मित्र या पदावरून तात्काळ काढून टाकण्यात यावे याप्रकरणी कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ओव्हाळ, ज्येष्ठ नेते निवृत्ती हौसमल, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघमारे,धाराशिव तालुका अध्यक्ष संपत सरवदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मस्के,आधीच्या स्वाक्षर्या आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.