विकास बारकुल यांची धाराशिव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने येरमाळा गावच्या वतीने सत्कार

येरमाळा येथील माजी सरपंच विकास बारकुल यांची धाराशिव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पदी निवड झाली.या निवडी निमित्त त्यांचा आज येरमाळा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला.
येरमाळा येथील विकास बारकुल हे डॉ.पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजिसिंह पाटील यांचे अत्यंत निकट वर्तिय खंदे समर्थक मानले जातात.कॉलेज वयीन काळात त्यांनी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तर राज्य संघटक असताना राजकीय क्षेत्रात प्रवेश करत संघटनेचा जि.प.सदस्य निवडून आणला आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला तत्कालीन राष्ट्रवादी पक्षाचे,जिल्हा उपाध्यक्ष,कळंब तालुका अध्यक्ष,वयाच्या ३२ व्या वर्षी पंचायत समिती सभापती पदी निवड,त्या नंतर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कार्यअध्यक्ष,डी.सी.सी.बँकेचे संचालक तर गावचे सरपंच,कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती चे विद्यमान संचालक असून डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या नंतर आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या राजकीय प्रवेशा पासून ते आमदार राणा दादा यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात ओळख आहे.याशिवाय त्यांनी जिल्ह्याचा फेडरेशन,जिल्हा बँक,निवडणुका तसेच कळंब नगर परिषद निवडणुकीत महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
त्यामुळेच डॉ.पद्मसिंह पाटील,आमदार राणा दादा यांनी त्यांच्यावर भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विकास बारकुल यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर येरमाळा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना,उपसरपंच गणेश बारकुल,विजय देशमुख,तानाजी सवने,दशरथ जाधव,माजी जि.प.सदस्य मदन बारकुल,महेश बारकुल दिसत आहेत.