घर फोडून अंदाजे चार लाख 41 हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास
कळंब/जयनारायण दरक—-
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे घर फोडून चोरट्याने सोने चांदीचे दागिने व पैसे लंपास केले ही घटना रविवारी दिनांक(19) मध्यरात्री ते पहाटे चारच्या सुमारास घडली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली याबाबत पोलीस सूत्राकडून मिळाली माहिती अशी की कन्हेरवाडी येथील राजेंद्र नरसाप्पा कवडे त्यांच्या राहत्या घरातील पाठीमागच्या दरवाजाच्या कडी कोंडा तोंडुन चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला यावेळी पहाटे चार वाजता विनोद राजेंद्र कवडे आरडा ओरड करू लागल्याने घरातील कुटुंब जागे झाले व वरील मजल्यावर झोपलेले विनोद कवडे यांचे वडील राजेंद्र कवडे खाली उतरून पाहिले असता घराच्या पाठीमागील दरवाजाच्या कडी कोंडा तोडलेला दिसला व घरात जाऊन पाहिले असता घरातील दोन्ही कपाटाचे दरवाजे तोडलेले दिसले तसेच घरातील सुटकेस,पर्स,कपडे व ईतर सामान अस्थाव्यस्थ पडलेले दिसून आले व कपाटात ठेवलेले सोन्या चांदी दागिने बघितले असता दिसून आले नाही त्यामध्ये चार तोळ्याच्या सोन्याच्या चार पाटल्या, सोन्याचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याचे दीड तोळ्याचे लॉकेट, लहान मुलाच्या दोन अंगठ्या दोन बदाम कानातील गुंड,चांदीचे गणपती, आरती, करंडा,जोडवे, लहान मुलाचे चांदीचे पैंजन व इतर वस्तू असा मुद्देमाल लंपास केला असून त्याची एकूण रक्कम अंदाजे चार लाख 41 हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे अशी फिर्याद कळंब पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती मिळाली आहे याप्रकरणी राजेंद्र नरसाप्पा कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हणुमंत कांबळे यांच्या कडून मिळाली ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, गणेश वाघमोडे, पोपट जाधव, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे व त्यांचे इतर सहकारी घटनास्थळी दाखल होऊन स्वान पथक मागवुन पुढील तपासाची चक्रे जलदगतीने तपास करण्याची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हणुमंत कांबळे यांनी दिली आहे.