ताज्या घडामोडी

कळंब येथे धनगर एस टी आरक्षण अमलबजावणी संदर्भात घोंगडी बैठक

कळंब:- शुक्रवार दि २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा शासकीय विश्राम गृह येथे ३० नोव्हेंबर ला उस्मानाबाद येथे होणाऱ्या *धनगर एस टी आरक्षण अमलबजावणी मोर्चा* संदर्भात सकल धनगर समाज, कळंब च्या वतीने घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई विषयी *महारानी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई संचालक डॉ रामकृष्ण लोंढे* यांनी सविस्तर माहिती देत. न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात आली असून येत्या ८,११ व १५ डिसेंबर ला मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस अंतिम सुनावणी होऊन पुराव्यांच्या आधारे केसचा निकाल लवकरच धनगर समाजाच्या बाजुने सकारात्मक लागू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
धनगर एस टी आरक्षण अमलबजावणी चा मुद्दा गेले ७५ वर्षे प्रलंबित असुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील लढाई जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या *३० नोव्हेंबर ला उस्मानाबाद* येथे जिल्ह्यधिकारी कचेरीवर धनगरांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास एक लाख धनगर बांधव या विशाल महामोर्च्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती गणेश एडके यांनी यावेळी दिली आहे.
या संबंधी प्रबोधन मंच चे जिल्हाध्यक्ष प्रा सोमनाथ लांडगे यांनी न्यायालयात चालू असलेल्या केस संदर्भातील माहिती दिली. तसेच दिनेश बंडगर यांनी तालुक्यातील धनगर समाजातील युवकांना प्रत्येक गावात जाऊन समाजातील महीला युवकांना आरक्षन संदर्भात बैठक घ्यावात असे आवाहन केले.
यावेळी डॉ स्नेहा सोनकाटे यांनी निवडणूका च्या आधी धनगर समाजाच्या आरक्षनाची आमल बजावनी केली नाही तर कोणत्याही पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाही असे या बैठकीत ठणकावून सांगितले यावेळी तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता…

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.