ताज्या घडामोडी

चोरी गेलेली कार आरोपीसह पकडण्यात पोलिसांना यश

जयनारायण दरक-/कळंब —–

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पार्डी रोडवरील शिवनेरी हॉटेल समोर उभी असणारी कार क्र एम एच २६ ए एफ ३१६४ चोरीची घटना घडली होती . ही घटना मंगळवार दि २४ ऑक्टोबर रो बसजी घडली होती . या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात संदीप विठ्ठल सुतार यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणी पो हे कॉ शबाना मुल्ला या तपास करत होत्या . यावेळी ही गाडी ओ एल एक्स या ऑनलाईन गाडी खरेदी विक्री च्या सांकेतिक स्थळावर गाडीचा नंबर बदलून गाडी विकण्याचा आरोपी प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाली . या माहितीच्या आधारे पो नि प्रल्हाद सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्याशी चर्चा करून तपासी अंमलदारास पुढील तपासाची योग्य दिशा दिली . वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासी अंमलदाराने तपासाची चक्रे फिरवली . त्यांनी याकामी एक पथक तयार केले . ओ एल एक्स वर असणाऱ्या फोन नंबर वर संपर्क करून आरोपी अनिल बंडू शिंदे रा भादली ता घनसांगवी जि जालना , हल्ली मुक्काम चेतना कॉलनी एम आय डी सी अहमदनगर याच्याकडे बनावट ग्राहक पाठवले . त्या ग्राहकाने गाडीची संपूर्ण चौकशी केली . गाडीची खातरजमा केली . गाडीची व आरोपीची खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने आरोपी व गाडी ताब्यात घेतली . आरोपीने या गाडीचा नंबर एम एच २० बी वाय ३३१८ असा बदलेला दिसून आले . आरोपीस भूम न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे . चोरीच्या गाड्यांचा तपास लागत नाही . मात्र भूम पोलिसांनी अवघ्या महिनाभरात मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत . या पथकामध्ये स पो नि कुणाल सूर्यवंशी , पवन निंबाळकर यांच्यासह पो हे कॉ शशिकांत खोत , पोलीस अंमलदार दगडू भुरके यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली या प्रकरणाचा पर्दाफाश केला .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.