ताज्या घडामोडी

राजकीय नेत्याच्या नातेवाईकांचा प्रताप, कोरोना काळात बोगस बिल तयार करून कोटी रुपयांचा गैरव्यवहार

कळंब/जयनारायण दरक

धाराशिव नगर पालिकेत मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार, गैरव्यवहार, अनियमितता झाली असून, याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यावर सात तर लेखापाल सुरज बोर्डे यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. गुंठेवारी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद धाराशिव येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणि विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद धाराशिव ( रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा.मु. समर्थ नगर धाराशिव ) यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.